शहरात महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

0

जळगाव :- महाशिवरात्रीच्या पूर्वदिनी शहरातील शिवमंदिरांची सजावट करण्यात आली आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरांवर रंगरंगोटी, विद्युत रोषणाईसह आकर्षक सजावट करण्यात आली आहे. भविकांना दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी आज दिवसभर मंदिरे खुली ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आज शिवमंदिरामध्ये भाविकांची एकच गर्दी पहावयास मिळते.

शहर परिसरातील ओंकारेश्वर मंदिर, गोलाणी मार्केच्या मागील बाजूस असलेले भोले शंकर मंदिर, नवीन बस स्टॅण्ड समोरील महादेव मंदिर, निमखेडी रोडजवळली शिवधाम मंदिर यासह उपनगरांमध्ये असलेली लहान, मोठ्या मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
तसेच महाशिवरात्रीनिमित्त मंदिराच्या आवारात पहाटेपासूनच गर्दी होणार असल्याने मंदिराच्या आवारात बेलपत्र, बेलफळ, फुले, पुष्पहार विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे.

विविध कार्यक्रम
दरम्यान श्री सत्संग भजन मंडळाकडून रात्री ७ ते १२ सुश्राव्या शिवभजनांचा कार्यक्रम होणार आहे. युवा गुरव मंडळातर्फे सायंकाळी ६ वा. पांझरापोळ संस्थान येथे भजनसंध्येचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सिद्धी व्यंकटेश देवस्थानतर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही सायंकाळी ५ वाजता भव्य रथयात्रा काढण्यात येणार आहे. बालाजी मंदिरापासून रथाची विधिवत पूजा होवून रथयात्रा रथचौक, सराफ बाजार, दाणाबाजार, नवीपेठ, शिवाजी पुतळा, बसस्थानक मार्ग, आकाशवाणी चौक मार्गे सिद्धी व्यंकटेश मंदिर येथे पोहचेल

Leave A Reply

Your email address will not be published.