शहरात भर उन्हाळ्यात हजारो लीटर पाण्याची नासाडी

0

जळगाव । अगोदरच तीव्र पाणीटंचाईचा सामना जळगावकरांना करावा लागत असून यातच विवेकानंदनगरात सोमवारी व्हॉल्व गळतीमुळे भर उन्हाळ्यात हजारो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. पाईपलाईन गळती, व्हॉल्व गळतीच्या घटनांचे सत्र नेहमीच सुरु झाले आहे. या अगोदर आठवडाभरापूर्वी मेहरुण येथे चाटे मळा, स्मशानभूमी येथे पाण्याच्या पाईपलाईन गळती झाली होती. या गळतीमुळे प्रभावीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत झालेला नसतांनाच दुसरीकडे पुन्हा लागलेल्या गळीत लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे पुन्हा जळगाव शहरावर पाणीटंचाईचे सावट उभे राहिले आहे.

यावेळीही हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली होती. तेथील पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करुन पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात आला होता. या पाठोपाठ आठवडा होत नाही तोच विवेकानंद येथे पाण्याच्या पाईपलाईनला व्हॉल्व गळती सुरु झाली. यामुळे पाईपलाईनमधून हजारो लीटर पाणी रस्त्यावर वाया जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.