जळगाव:- शहरात वाहनांची कसून चौकशी सुरू केली आहे वाहनाची कागदाची पूर्तता आहे की नाही आहे यासंदर्भात चेकिंग सुरू केली आहे शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरातील सर्व पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी आपल्या प्रभागातील भागांमध्ये जाऊन वाहनांची कसून चौकशी केली आहे.
यामध्ये वाहनांची कागदांची पूर्तता आहे की नाही आहे. नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंडे यांनी दिले यावेळी जळगाव शहरातील कांचन नगर परिसर तांबापुरा गेंदालाल मिल परिसर पिंप्राळा हुडको शिवाजीनगर हुडको शनिपेठ मास्तर कॉलनी सुप्रीम कॉलनी या प्रभागांमध्ये पोलिसांनी वाहनांची कसून चौकशी केली या मध्ये काही वाहनाचे कागद पत्राची पूर्तता नसल्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी अधिक माहिती दिली.