जळगाव :- एमआयडीसी पोलीस स्टेशनसमोर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आज सकाळी आढळून आल्याने खळबळ उडालेली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, हा व्यक्ती भिकारी असावा त्याला उन्हाचा फटका बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज देखील वर्तविण्यात येत आहे. सकाळी कुत्रे मृतदेहाचे लचके तोडत असताना येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला. एमआयडीसी पोलिसांनी धाव घेत मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला.