जळगाव :- गुडीपडाव्यानिमित्त जळगाव लोकसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार आ. उन्मेष पाटील यांचा प्रचाराला प्रारंभ जुन्या जळगावातील श्रीराम मंदिरात नारळ फोडून श्रीरामाच्या जयघोषात करण्यात आला. यावेळी राजू मामा यांनी जळगाव शहरातून सुमारे एक लाखाच्या मताधिक्य मिळवून देऊ अशी ग्वाही दिली.
दरम्यान, शहराच्या विविध भागांमधून त्यांच्या प्रचाराची फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीत भाजप, शिवसेना व मित्रपक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. ठिकठिकाणी या प्रचार फेरीचे स्वागत करण्यात आले.
यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजीमंत्री सुरेशदादा जैन, आ. राजूमामा भोळे, महापौर सीमा भोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे, ललित कोल्हे, सुनील महाजन , उद्योगपती श्रीराम खटोड, शरद तायडे, नगरसेवक मुकुंदा सोनवणे, रिपाईचे अनिल अडकमोल यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.