चोपडा | प्रतिनिधी
येथील शिवम आयुर्वेद ऍग्रो इंडस्ट्रीज, निमगव्हाण चे संचालक शशिकांत पाटील यांना सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यपाल कोशारी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे दिला जाणारा “मान कर्तृत्वाचा, सन्मान नेतृत्वाचा” राज्यस्तरीय “कृषी भूषण” पुरस्कार नुकताच जाहीर झाला. सदर पुरस्कार ६ जानेवारी २०२१ रोजी दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. या पुरस्कारा बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. केळी, ऊस, कापूस व भाजीपाल्यांसह सर्वच पिकांवर 100% हर्बल औषधे शेतकऱ्यांना त्यांच्या मागणी नुसार पुरवठा करीत असतात. त्यांचा या पूर्वीही अनेक संस्थांनी सन्मान केलेला आहे. त्यांचा निवडी बद्दल सामाजिक कार्यकर्ते, तांदळवाडी तालुका चोपडा यांनीही अभिनंदन केले आहे.