मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिन निमित्ताने पक्षाध्यक्ष शरद पवार उद्या 9 जून रोजी फेसबुक लाईव्ह करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता शरद पवार फेसबुकवर लाईव्ह असणार आहेत. यावेळी ते पक्षाच्या ध्येयधोरणाविषयी बोलण्याची शक्यता आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाचं काम करताना कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी ते समजावून घेणार आहेत. त्याचप्रमाणे या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये आलेल्या प्रश्नांचे उत्तर शरद पवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा इथून पुढच्या प्रचारात डिजीटल मीडियाचा अधिकाधिक वापर करण्याचा मानस आहे.