शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वरील 2 जणांना कोरोनाची लागण

0

मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सेलिब्रिटींपासून ते अन्य राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती समोर आली आहे. सिल्व्हर ओकवरील 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

शरद पवार यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एकूण सहा जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. रॅपिड टेस्टमध्ये यातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील कोणीही शरद पवारा यांच्या संपर्कात नव्हते, अशीही माहिती आहे.दरम्यान, सिल्व्हर ओकवरील इतर सर्व कर्मचारी आणि पवारांच्या स्वीय सहाय्यकांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र त्याचे रिपोर्ट येणं बाकी आहे.

दरम्यान, थेट सिल्व्हर ओकवरील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विशेष खबरदारी घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार पुढील काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याचं समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.