मुंबई – एकनाथ खडसे कन्या रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. या प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा करणार होते. हा दौरा मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत होता मात्र आता हा दौरा रद्द झाला आहे.
याबाबत माध्यमांशी बोलतांना एकनाथ खडसे यांनी दौरा रद्द होण्यामागील कारण सांगितले आहे. नाथाभाऊ म्हणाले दौरा रद्द नाही तर स्थगित झाला आहे.
ते पुढे म्हणाले,’शरद पवार २० आणि २१ नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार येथे शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपस्थित राहणार होते. मात्र शरद पवारांच्या दौऱ्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने परवानगी देण्यास नकार दिला. मोठ्या प्रमाणात गर्दी होणं अडचणीचं ठरलं असतं. यामुळेच दौरा रद्द नाही तर स्थगित करण्यात आला आहे”.