शपथविधीपूर्वी मोदींचे बापू, वाजपेयींना नमन

0

नवी दिल्ली : लोकसभेत घवघवीत यश मिळविल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा आज शपथविधी सोहळा सायंकाळी पार पडणार आहे. तत्पूर्वी, मोदी यांनी राजघाट येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळी वायपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली. याबरोबरच मोदींनी राष्ट्रीय युद्ध स्मारकात देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहिदांनाही श्रद्धांजली वाहिली.

या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज नेतेमंडळी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधीची तयारी राष्ट्रपती भवनात जोरात सुरू असून, नव्या मंत्रिमंडळात अरुण जेटली नसतील व अमित शहा यांचा मात्र समावेश होईल आणि त्यांना अर्थमंत्रिपद मिळू शकेल.

Leave A Reply

Your email address will not be published.