शनिवार-रविवार कडक निर्बंधाचे पालन

0

किनगाव (प्रतिनिधी) : या गावात पुर्वीपासून नियमाचे पालन करण्यासाठी नागरिक सरसावतांना दिसते याचाच भाग म्हणून राज्य शासनाच्या कडक निर्बंधाचे पालन गावकरी करीत आहेत.

सध्या करोना महामारीचे संकट सर्वत्र गोंगावत असतांना राज्य शासनाने शनिवार-रविवार कडक निर्बंध घातल्यांने या नियमाचे गावकरी तंतोतंत पालन करीत असल्यांने गावात शुकसुकाट पसरली आहे.

गावात बाजार पेठ बंद यामुळे किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, भांडी स्टोअर्स, कापड दुकान, हॉटेल, पानटपरी, शोरूम, सोना- चांदीचे दुकान, सलुन, बुट-चप्पलचे दुकान, भुसार माल खरेदी विक्रि आदीची वर्दळ थंडावल्यांने नागरिकांना गेल्या वर्षी पासून कापडे, बुट, कटिंग आदी घेण्यापासून सुटकार मिळून खर्चही कमी झाला असल्याचे चित्र पहावयास मिळते.एकमेकाच्या गावांना जाणे-येणे कमी झाल्यांने नाते गोत्याचे प्रेम ही कमी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.सर्वसामान्य गोरगरीबांची एसटी बंद असून खाजगी वहानही नाहीत मग एकमेकातील जिव्हाळा नाहीसा होत आहे सध्या मेडिकल,दवाखाना, पोलीस स्टेशनचा कारभार चालू आहे ही भयावह स्थिती कधी संपुष्टात येईल याचे कोणालाही भविष्यवाणी करता येत नसल्याने गोरगरीब जनतेचे जगणे मुस्कील बनले आहे मात्र शासनाच्या निर्बंधाना नागरिक प्रतिसाद देत आहे या करीता पोलीस प्रशासन चोख बंदोबस्त देत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.