शतपावली करतांना छतावरून पडून सेवानिवृत्त अभियंत्याचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरातील शहरातील उदय कॉलनी भागात सेवानिवृत्त अभियंता घराच्या छतावर शतपावली करत असतांना तोल जावून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील उदय कॉलनी येथे सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता संजीव भास्कर पाटील (वय ६०) हे आपला कुटुंबीयांसह राहतात. शुक्रवार १० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास जेवण करून दुमजलीवर छतावर शतपावली करण्यासाठी गेले. ते मोबाईलवर बोलत असतांना शतपावली करत होते. त्यावेळी अचानक तोल गेल्याने ते दुमजली वरून खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले.

त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता त्यांना मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  पोलिस पुढील तपास जिल्हापेठ पोलिस कर्मचारी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here