शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलचे घवघवीत यश

0

राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषदेच्या राज्यस्तरीय स्पर्धेत पी.आर.हायस्कूलने पटकावली पाच पारितोषिके

धरणगाव –महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषद,पुणे यांनी बालदिनानिमित्त आयोजित केलेल्या आॅनलाईन विविध स्पर्धेत पी.आर.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध गटात पाच पारितोषिके पटकावली आहेत.

स्वलिखित कविता स्पर्धेत निलेश योगेश पाटील (इयत्ता सातवी )याने प्रथम क्रमांक पटकावला तर ▪️नाट्यछटा  स्पर्धेत पूर्वा दत्तात्रय केले(इयत्ता आठवी) हिने प्रथम क्रमांक पटकावला.

निबंध लेखन  स्पर्धेत वैशाली संजय रावतोळे(इयत्ता नववी )हिने द्वितीय  क्रमांक तर बालसाहित्य स्पर्धेत भाग्यश्री सुभाष सोनवणे (इयत्ता आठवी ) हिने द्वितीय आणि वैशाली संजय रावतोळे (इयत्ता नववी )हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.धरणगाव तालुका गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांनी हा निकाल शाळेला कळवला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार केला.यावेळी उपमुख्याध्यापक आर.के.सपकाळे ,पर्यवेक्षिका आशा शिरसाठ व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती. या विद्यार्थ्यांना बी.डी.शिरसाठ, डॉ. वैशाली गालापुरे, एस.के.बेलदार,गणेशसिंह सूर्यवंशी या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.