व.सा.का येथे ऑक्सिजन निर्मितिसाठी ना.सुभाष देसाई यांच्याशी सकारत्मक चर्चा

0

भातखंडे (प्रतिनिधी) : कोरोनाचा संभाव्य धोका व ऑक्सिजन तूट पाहता वसंत सहकारी साखर कारखाना लि. कासोदा ता एरंडोल येथील डिस्टिलरी प्लांट मध्ये यांत्रिक दुरुस्ती करून ऑक्सिजन निर्मिती करावी. म्हणून  पाचोरा बाजार समितीचे उपसभापति अँड विश्वासराव  राघो भोसले. (पिंपरखेड) यांनी थेट उदयोग मंत्री ना.सुभाष देसाई यांचेशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधला असता. ना.देसाई यांनी. व. सा. का.तुन ऑक्सिजन निर्मिति करणे साठी सकारात्मक चर्चा केली. व सदर मागणी बाबत तसा प्रस्ताव  पाठवण्याची सुचना केली.

तसेच व.सा.का.येथे कोणीही उधोगपती ऑक्सिजन निर्मिती करणार असेल. तर ऑक्सिजन स्वावलंबन योजने अंतर्गत विशेष प्रोत्साहनपर अनुदान तसेच विद्युत,  जि.स.टी.,मुद्रांक शुल्कात सूट. पाणी व इतर सवलती देऊ. असेही ना. देसाई यांनी अँड भोसले. यांचेशी चर्चा करताना आश्वासन दिल्याची माहिती. दिनांक. 22l5l2021.रोजी  अँड भोसले. यांनी दिली आहे.

उदयोग मंत्री ना. सुभाष देसाई यांचे सकारात्मक आश्वासना मुळे महाराष्ट्रातील उदोगपती नी राज्य शासनाच्या विशेष प्रोत्साहन योजनेतुन  व. सा.का येथील डिस्टीलरी प्लांट मधे यांत्रिक दुरुस्ती करून किवा डिस्टीलरीच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत नवीन प्लांटची उभारणी करून, येथील उपलब्ध साधनाचा वापर करून ऑक्सिजन निर्मिती करावी.व संभाव्य कोरोना परिस्थितीत राज्याची ऑक्सिजन गरज भागवावी. तसेच यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पक्षीय मत भेद बाजूला सारुन एकत्र येवून उद्योगपतीच्या माध्यमातुन व राज्य सरकारच्या ऑक्सिजन   स्वावलंबन योजने च्या माध्यमातून व. सा. का. सुरु करावा व येथून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन निर्मिति करावी. अशी विनंती/मागणी. अँड विश्वासराव भोसले. यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.