भुसावळ :- मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात कौशल्य विकास मंत्र्यांशी आमदार राजूमामा भोळे ,आमदार संजय सावकारे भुसावळ व व्हीटीपी बांधव यांच्यात व्हीटीपी समस्या तक्रारी व इतर गोष्टींवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या तक्रारींबाबत कौशल्य विकास मंत्र्यांनी यशस्वी प्रतिसाद देत काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यामध्ये आग्रही निमजाई फाउंडेशन ,श्रीहरी एज्युकेशन सोसायटी जळगाव,अनुज ट्रेनिंग सेंटर भुसावळ यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे राऊत सर यांना निवेदन देण्यात आले.बैठक सकारात्मकरित्या व यशस्वीरित्या पार पडली. यात आ.भोळे आणि आ.सावकारे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
यावेळी निमजाई फाऊंडेशनचे भूषण बाक्षे, शीतल पाटील, दीपक जावळे, श्रीहरी एज्युकेशन सोसायटी जळगावच्या ज्योती महाजन, अनुज ट्रेनिंग सेंटर भुसावळच्या अनिता आंबेकर आदी उपस्थित होते.