मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घटनेनंतर अखेर मुख्यमंत्रिपदासाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. आज सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर आज सर्व आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ देणार आहे. दरम्यान, यावेळी रावेर-यावल मतदार संघातील काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी राजभवनात आमदार पदाची गोपनिय शपथ घेतली.