Sunday, January 29, 2023

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर गँपरेप

- Advertisement -

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भुसावळ शहरातील कंडारी परिसरातील अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून आज याबाबत शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील कंडारी भागात राहणार्‍या अल्पवयीन मुलीवर २०१८ साली अत्याचार करून तिचा व्हिडीओ तयार करण्यात आला होता. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केला.  आतापर्यंत म्हणजे १२ जुलै २०२१ पर्यंत तिच्यावर त्यांनी नॉर्थ कॉलनीतील खाली असलेल्या रेल्वे क्वॉर्टर्समध्ये अत्याचार केले. या मुलीने याबाबत आपल्या कुटुंबियांना माहिती दिली नव्हती. मात्र अत्याचार करणारे तिला वारंवार धमकावत असल्याने या मुलीने आज आपल्या कुटुंबियांना याबाबत माहिती देऊन शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सर्वात  धक्कादायक बाब  म्हणजे अत्याचार पीडित  मुलगी ही अल्पवयीन असून तिच्यावर सामूहिक बलात्कार करणार्‍यांपैकी चार जण हे देखील अल्पवयीनच आहेत. त्या सर्वांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सुबोध सुरेश यशोदे (वय २०) या तरूणाला अटक करण्यात आली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतरांच्या वयाची पडताळणी करून कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. अत्याचार करणारे दोन्ही मुले हे पिडीतेचे वर्गमित्र आहेत. ओळखीतून सलगी वाढवत हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या भयंकर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे