जळगाव – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगाव येथे होणाऱ्या जाहीर सभेची जय्यत तयारी सुरु असून विमानतळा समोरील भारत फोर्जच्या १०० एकरात सुमारे सव्वा लाख लोक बसून भाषण ऐकतील एवढे मोठे वाटर प्रूप मंडप उभारण्यात येत आहे. सभेला येणाऱ्या वाहनांची अगदी सभास्थळाजवळ पार्किंगची व्यवस्था केली असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकलाईव’ शी बोलतांना सांगितले.