भडगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आज भडगाव शहरात भडगाव पोलिस स्टेशन तर्फे पोलिस पथसंचलन (रूट मार्च) काढण्यात आला होता.
भडगाव शहरातील यशवंत नगर येथील गणपती मंदिर येथून रूट मार्च ची सुरुवात करण्यात आली. पुढे मारुती मंदिर, नुरानी मजित, मराठी शाळा, शिवाजी नगर, महालक्ष्मी कॉलनी, बाळद रोड, पारोळा चौफुली, बसस्तानक, पाचोरा चौफुली, टोंनगाव, आझाद चौक, नगरपालिका, मेन रोड मार्गे पोलिस स्टेशन असा रूट मार्च काढण्यात आला होता. या रूट मार्च वेळी पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे, ७२ बॉर्डर विंग कॅमांडो, २० पोलिस कर्मचारी, ३० होमगार्ड यांच्यासह पो. ना. लक्ष्मण पाटील, ईश्र्वर पाटील, आदी उपस्थित होते.