#व्हिडिओ : गिरीश महाजन यांचे वन्य जिवांवरील प्रेमाचे दर्शन ; घोरपडीला दिले जिवदान

2

जळगाव (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगाव येथे रविवार दि.13 रोजी होणार्‍या जाहीर सभा स्थळी निघालेल्या घोरपडीला जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अलगदपणे जिवंत पकडले तेव्हा सभास्थळाच्या मैदानावर उपस्थित सर्वजण अचंबित झाले. आज दुपारी 12.45 वाजता पालकमंत्री गिरीश महाजन हे पंतप्रधान मोदी यांच्या जाहीर सभेच्या ठिकाण व्यवस्थेची पहाणी करत असतांना सभा मंडप उभारणार्‍या कर्मचार्‍यांना घोरपड दिसली. त्या घोरपडीला मारणार इतक्यात गिरीश महाजनांनी जोरात आवाज दिला आणि तिला मारू नका…असे म्हणत घोपरपडी केडे गेले. दरम्यान, घोरपड निंबाच्या झाडावर चढली होती. झाडावरून घोरपड खाली उतरताच महाजनांनी तिच्या तोंडावर पाय ठेवून तिचे तोंड अलगद पकडले. एक पिशवी म्हणजे सिमेंन्टच्या रिकाम्या गोणीत तिला बंद केले. त्यानंतर घोरपड असलेली पिशवी स्वत:च्या गाडीत ठेवायला सांगितले व मी तिला लांब सोडून देईन असे सांगितले. घोरपडीला उपस्थित शेकडो कर्मचारी घाबरत होते. परंतू गिरीश महाजन यांनी तिला पकडले तेव्हा सर्वच उपस्थितांनी टाळ्या वाजवून तिच्यांचे कौतुक केले. जळगाव विमानतळासमोर भारत फ ोर्ड कंपनीच्या शंभर एकर जागेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. याप्रसंगी नाशिक विभागाचे डिआयजी छेरिंग दोरजे, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.उगले, आ.चंदूभाई पटेल, नंदू आडवाणी तसेच मोठ्या संख्येने काम करणारे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना गिरीश महाजन म्हणाले की, घोरपड पकडणे माझ्यासाठी किरकोळ बाब असून मोठमोठ्या अनेक विषारी सापांना अलगदपणे पकडून जंगलात सुरक्षीत स्थानी पोहचवून मी त्यांचे जिव वाचविले आहेत. कोणत्याही वन्य प्राण्यांना न मारता त्यांचे जिव वाचविणे हे माझे ध्येर्य असल्याचे त्यांनी सांगितले. वन्य प्राण्यांना मारायचे नाही हे मी सर्वांना कटाक्ष्याने सांगतो. फक्त चाळीसगाव परिसरातील नरभक्षक बिबट्याला मी मारण्यासाठी पुढाकार घेतला होता. कारण त्याने काही शेळ्या, गाई व माणसांचा जिव घेतला होता. शासनाने त्याला मारण्याची परवानगी दिली होती असे गिरीश महाजन यांनी लोकशाहीशी बोलतांना सांगितले.

2 Comments
  1. Zumbachuku says

    Baatalila baaich chitra

  2. Sanjay Sonawane says

    Bhau is Great

Leave A Reply

Your email address will not be published.