अमळनेर ;- पितृछत्र पाठोपाठ अपघातात मातृछत्र ही हरपल्याने लहान वयात एकाकी पडलेल्या लकी पाटील याला ताडेपुरा वासीयांनी मदत केली.
मागील दोन महिन्यांपूर्वी शालीक पाटील,रा.ताडेपुरा याने नाशिक येथे आत्महत्या करून आपले जीवन संपवले या घटनेत 1 महिना उलटत नाही त्या आत पत्नीचेही अपघाती निधन झाले.परिवाराची परिस्थिती बेताची त्यात मुलगा लकी पाटील एकाकी पडल्याने त्याला काही आर्थिक मदत व्हावी म्हणून
सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कंखरे यांच्या संकल्पनेला अनिल ठाकरे,विजय पाटील व सर्व मित्र परिवाराने मोलाची साथ देत व्हाट्सएप ग्रुप च्या माध्यमातून पन्नास हजार रु ची आर्थिक मदत केली.