व्यायमशाळेचे रखडलेले काम त्वरीत पुर्ण करावे ; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने दिले ग्रामपंचायतीला निवेदन

0

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातिल चुंचाळे येथे शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतून व्यायम शाळेचे जवळपास आठ लाखाचे काम मजुर करण्यात आले होते जवळपास तिन वर्ष उलटुनही व्यायमशाळेचे काम अपुर्ण असल्याने तरुण मुलांमध्ये  नाराजी उमटत आहे या संदर्भात  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने चुंचाळे ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे. सरपंच यांनी गावातील स्थानिक आमदार निधीतून निर्माणास असलेली व्यायाम शाळा पूर्णत्वास नेऊन लवकरात लवकर लोकार्पण करण्यात यावीव्यायामशाळेचे कामाची चौकशी करून काम पूर्णत्वास न्यावे व मुलांना सोयी-सुविधा उपलब्ध करून घ्यावेत जेणेकरून मुलांचे भवितव्य सुधारेल व ते सैन्य व पोलीस भरती मध्ये पात्र ठरून चुंचाळे गावाचे नाव नावलौकिक  करतील. आपण दखल घ्यावी व मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी या निवेदनावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे साकळी दहिगाव जिल्हा परिषद गट प्रमुख प्रतिक पाटील,समाधान पाटील,सागर धनगर,शाहरुख तडवी,विशाल पाटील,मुस्तुफा तडवी,राजेश पाटील,अकबर तडवी,समिर तडवी,राजु तडवी,अकबर दलशेर तडवी,फिरोज तडवी यांनी मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.