व्यापक समाजसेवेसाठी राजकारणात ?

0

जळगाव प्रतिनिधी

भुसावळ विधानसभा मतदार संघातून डॉ. मधु राजेश मानवतकर या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. त्यांचे पती डॉ. राजेश मानवतकर हे सुद्धा पेशाने डॉक्टर असून भुसावळला मानवतकर हॉस्पिटल येथे हे दोघे वैद्यकीय सेवा देतात. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार्‍या डॉ. मधु मानवतकर या स्त्रीरोग तज्ञ असून त्यांचे पती डॉ. राजेश मानवतकर हे हृदयरोग तज्ञ आहेत. त्यांनी अनेक रुग्णांना आपली वैद्यकीय सेवा दिलेली आहे, देत आहेत. वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त आता मोठ्या प्रमाणात समाजाची सेवा करण्यासाठी म्हणून त्या राजकारणात येऊ इच्छितात. राजकारण करणार्‍या माध्यमातून सामाजिक सेवा विस्तारण्याचा त्यांना विचार आहे. त्याचबरोबर भुसावळ तालुक्याच्या विकासाचे व्हिजन त्यांचेकडे असल्याचे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रचार पत्रकांत म्हटले आहे. त्या प्रचार पत्रावर त्यांनी दिशा परिवर्तनाची दूरदृष्टी विकासाची असे घोषवाक्य प्रसिद्ध केले आहे. त्याबरोबरच त्या म्हणतात चांगल्या उद्देशाला साथ द्या, विकासाला आशीर्वाद द्या, असे त्यांनी आवाहन केले आहे. डॉ. मधु मानवतकरांच्या उमेदवारीला माजी आमदार संतोष चौधरी व त्यांच्या गटाकडून पाठींबा देण्यात आलेला आहे. व्यापक समाजसेवेसाठी राजकारणात उतरत असल्याचा त्यांनी आपला मानसही व्यक्त केला आहे. डॉ. मधु मानवतकर या स्त्रीरोग तज्ञ आहे. त्या माध्यमातून गोर-गरीबांची सेवा करण्याची मोठी संधी असताना त्या राजकारणाचा आसरा घेऊ इच्छितात ही बाब चांगली तरी स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून सेवा देतांना गर्भलिंग निदान केले. म्हणून त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल झाला होता. रजीस्ट्रेशन नसताना गर्भलिंग निदान करावयाच्या मशिनचा त्यांनी वापर केला म्हणून न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर त्यातून त्यांची सुटका झाली. वगैरे भाग अलहिदा. परंतु आता व्यापक समाजसेवा करण्यासाठी राजकीय सत्ता हवी, असे त्या म्हणतात. त्यामुळेनभुसावळ शहर व मतदार संघात दबक्या आवाजात लोक बोलतात. सौ चुहे खाकर बिल्ली चाली हाजको जनता हुशार आहे. सर्वही लक्षात ठेवतात.

Leave A Reply

Your email address will not be published.