व्यसनापासून दूर होण्याकरिता चांगले छंद जोपासावे – आमदार सावकारे

0

भुसावळ-

समाजातील चांगल्या घटकांनी जर ठरवले तर निश्चित व्यसनमुक्ती होण्यास सहकार्य मिळेल .कमजोर व कमकुवत वा आपल्यात काहीतरी कमी आहे असा न्यूनगंड असणारे व्यसनाकडे लवकर वळतात याकरिता आजच्या तरुण पिढीने सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर करावा केवळ गुड मॉर्निंग व अन्य पोस्ट फॉरवर्ड करण्यापेक्षा तंबाखू ,दारू, सिगारेट ,गुटखा यासारख्या अंमली पदार्थाचे सेवनाने होणारे दुष्परिणाम बाबत जनजागृतीसाठी पोस्ट टाकून व्यसनाधीन नागरिकांना वाईट व्यसनापासून परावृत्त केले पाहिजे .व्यसनापासून दूर होण्याकरिता चांगले छंद जोपासले पाहिजे , आत्मविश्वास वाढवला पाहिजे असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी केले .

31 में हा  जगतीक तंबाखू विरोधी दिवसम्हणुन साजरा केला जातो त्या निमित्ताने आर्या फौंडेशन तर्फे भुसावळ पंचायत समिती सभागृह  येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करतांना आमदार बोलत होते . यावेळी आजच्या तरुणाईने व भावी पिढीने व्यसनांच्या विळख्यातून दूर ठेवण्याकरिता गायन, वाचन, चित्रकला,खेळ यासारखे चांगले छंद जोपासावे असेही आमदार सावकारे यावेळी सांगितले .सिनेसृटीतील अभिनेते कलावंत हे अभिनय करतात मात्र ते स्वतः व्यसनापासून दूर असल्याबद्दल अमिताभ बच्चन, सिद्धार्थ जाधव,अजय देवगण , अमिरखान आदींचे उदाहरण देऊन पैलू उल्लेखनीय कार्याची माहिती दिली . आत्मविश्वास व दृढ निर्णयामुळे व्यसनाधीन व्यक्ती व्यसनापासून दूर राहू शकतो याकरिता सत्याचा स्विकार करून खरे बोलण्याची प्रवृत्ती व आत्मविश्वास भावी पिढीला व्यसनापासून निश्चित दूर करेल असा ठाम विश्वास व्यक्त करून मुलांचे सहकारी व सोबती तसेच आपला परिसर याकडेसुद्धा कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे असा मौलिक व मार्मिक सल्लाही यावेळी दिला .

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नाहाटा महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा डॉ सौ मीनाक्षी वायकोळे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून बाजारपेठ पोलीस निरीक्षक देविदास पवार ,पंचायत समिती गटविकास अधिकारी विलास भाटकर , शहर पत्रकार संस्थेचे अध्यक्ष  संजयसिंग चव्हाण ,दैनिक लोकशाही उपसंपादक उज्ज्वला  बागुल , महाराष्ट्र नशाबंदी मंडळ  सचिव चंद्रकांत चौधरी,आदी मान्यवर उपस्थित होते .

प्रारंभी व्यसनमुक्ती बाबत  लावण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार संजय सावकारे , पोलीस निरीक्षक देविदास पवार , यांचे हस्ते करण्यात आले .तदनंतर उपस्थित मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजन करण्यात येऊन कार्यक्रमास प्रारंभ झाला .तसेच आमदार संजय सावकारे यांनी तंबाखू मुक्त जिवन  संकल्प  याबाबत उपस्थित सर्वाना शपथ दिली .  प्रास्ताविकात  आर्या फाउंडेशनच्या उपाध्यक्षा डॉ सौ वंदना वाघचौरे यांनी गेल्या 10 वर्षांपासून आर्या फौंडेशन या संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्ती करिता अहोरात्र कार्य करीत असून आजपर्यंत सुमारे 200 च्यावर नागरिकांना व्यसनांच्या  विळख्यामधून सोडविले असून आलेले अनुभव सांगून संस्थेचे उद्दिष्ट व वैशिष्ट्य सांगितले . तर प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांनी व्यसनां पासून परावृत्त होण्याकरिता सर्वानी मनापासून आत्मविश्वासाने निर्णय घेतला पाहिजे असे सांगून आर्या फौंडेशनच्या कार्याचे कौतुक व स्तुती करून त्यांना भविष्यात सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली . तसेच गटविकास अधिकारी विलास भाटकर यांनी प्रत्येक सुजाण नागरिकाने किमान एका वर्षात एकाचे तरी वाईट व्यसन सोडवून त्याला व त्यांच्या कुटूंबियांना सुखी व आनंदी जिवन  जगण्याकरिता सहकार्य करू असे ठरविले पाहिजे . अंमलीपदार्थांच्या सेवनामुळे कौटुंबिक स्वास्थ लाभत नाही याकरिता शक्य होईल तेवढ्या नागरिकांना प्रत्येकाने दुष्परिणाम बाबत पटवून दिले तरी समाजातील बहुतांशी व्यसनाधीनता कमी होईल असे मत व्यक्त केले . तर शहर पत्रकार संस्थेचे अध्यक्ष संजयसिंग चव्हाण यांनी व्यसन व त्यामुळे होणारे दुष्परिणाम याबद्दल काही सोदाहरण देत व्यसनामुळे संपलेल्या कुटुंबप्रमुखामुळे अनेक कुटुंबातील व्यक्तींवर भयानक व विदारक ओढवलेली परिस्थिती कशी अनुभवली आहे हे सांगून आर्या फाउंडेशन च्या उत्कृष्ट कार्यास सर्वोतोपरी सहकार्य करणार  असल्याचे सांगितले . अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ सौ मीनाक्षी वायकोळे यांनी व्यसनमुक्ती करिता घराघरांमधून प्रयत्न झाले पाहिजे असे सांगून तरुणाईने आपण स्वत: व आपल्या  कुटुंबास निरोगी व निरामय जिवणं जगण्याकरिता व सदैव आनंदी बघण्यासाठी आजच्या पिढीने स्वतःच वाईट व्यसनापासून दूर राहील व कधीच व्यसन करणार नाही याबद्दल निर्णय घेतले पाहिजे . यामुळे कुटुंब व्यवस्थासुदृढ राहील ओघाने समाजव्यवस्था निरोगी राहील असे ठाम निर्णय अंगी जोपासले पाहिजे असे मत व्यक्त केले .

यावेळी गिरीश नेमाडे  व सौ मालू नरवाडे यांनी त्यांच्या पतीवर व्यसनामुळे उद्भवलेली परिस्थिती व त्यापासून कश्यापद्धतीने सुटका केली याबाबतची आपबीती  उपस्थितांना कथन केली असता सर्वांचे डोळे पाणावले .गिरीश नेमाडे यांनी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे त्यांच्या धाडसाचे  स्वतः आमदार सावकारे यांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले व परिस्थितीला न डगमगता सामोरी जाऊन कुटुंबासह पतीला व्यसनापासून ओढून आणलेल्या रणरागिणी सौ मालू यांचा सत्कार प्राचार्य  सौ वायकोळे यांनी केला .प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष उमेंद्र वाघचौरे ,उपाध्यक्ष डॉ वंदना वाघचौरे सचिव सौ लता तायडे यांच्यासह ऋषिकेश , सुवर्णा, भाविका , शुभम यांनी केले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजश्री देशमुख यांनी तर आभार तनिष्का साळवे या विद्यार्थिनीने केले.

Leave A Reply

Your email address will not be published.