भुसावळ :- येथील झेड टी सी परिसरात वेष बदलवून राहणारा गुजरात राज्यातील दाहोद वॉरंट मध्ये गेल्या तीन वर्षांपासून फरार आरोपीच्या आज शनिवार बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून आरोपीस ताब्यात घेतले आहे.
गुजरात राज्यातील दाहोद येथील वॉरंट मधील 3 वर्षांपासून फरार असलेला ( imprisonment warrant) वॉरंट क्रमांक .104/2019 मधील आरोपी गजानन समसिंग पाटील वय-42 (मूळ राहणार – भुसावळ) हा काही दिवसांपासून स्थानिक झे टी सी परिसरात शिख लोकांच्या पेहराव प्रमाणे वेशांतर करून राहत असल्याची खबर गुप्त माहिती पोलीस निरीक्षक देविदास पवार यांना मिळाली त्याबरून त्यांनी याभागात आपली तापासचक्रे फिरवून सापळा रचून आरोपीस ताब्यात घेवून अटक केली. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले पोलीस अधीक्षक लोहित मतानी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड,व पोलीस निरीक्षक देविदास पवार याच्या मार्गदर्शन खाली स फो तस्लिम पठाण,पो ना चंद्रकांत बोदडे,पो का विकास सातदिवे, जितेंद्र साळूके,रविंद्र तायडे यांनी केली आहे.