जळगाव – वैद्य नरेंद्र गुजराथी यांच्या पेटंटला मान्यता मिळाली असून त्यांचे हे तिसरे पेटंट आहे.वैद्य नरेंद्र गुजराथी यांनी ङ्गए पोसेस फॉर प्रिप्रेशन ऑफ गेल अॅनिमा कम्पोझिशनफ म्हणजे गेल एनिमा रचना तयार करण्यासाठी एक प्रक्रियेसाठी पेटंट मिळवले आहे. एनिमा घेण्याअगोदर प्रत्येक वैद्याला औषधी काढा करून त्वरीत द्यावा लागतो. वैद्य गुजराथी यांच्या संशोधनामुळे उपचारापूर्वी काढा करण्याची झंजट कमी झाली. इन्स्टंट काढा बनविणे सोपे झाल्याने वैद्यांच्या वेळेची बचत होणार आहे. रुग्णांवर त्वरीत उपचार करणे सोपे झाले. हे औषध दीर्घकाळ कमी मात्रेत स्टोअर करणे सोपे होणार आहे.
आयुर्वेदामध्ये तीन पेटंट मिळवणारे वैद्य गुजराथी हे देशभरात पहिले संशोधक ठरले आहे. त्यांना 2010 मध्ये स्वयं एनिमा उपकरणासाठी पहिले तर 2016 स्थानिक फ्युमिगेशनसाठी एक यंत्रासाठी दुसरे पेटंट त्यांना प्राप्त झाले आहे. यानंतर आता त्यांना तिसरे पेटंट प्रदान करण्यात आले आहे. या संशोधन करार्यात प्रसिध्द पेटंट अॅटोर्नी प्रा. कानन पुराणिक, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विज्ञान विभागाचे डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.