चोपडा | प्रतिनिधी
येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंती निमित्ताने धनगर वाड्यात आहील्यादेवी मित्र मंडळची स्थापना व फलक अनावरण पंचायत समिती सभापती आत्मारामभाऊ म्हाळके , नगरसेवक महेंद्र धनगर, नगरसेविका सरलाताई शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमासाठी डाॅ नरेंद्र शिरसाठ, भगवान नायदे, शामभाऊ धामोळे, योगेश कंखरे ,सरपंच खटुबाई भिल्ल,उपसरपंच सुरेश पाटील, माजी उपसरपंच विनोद पाटील, माजी व्हा चेअरमन सुनिल पाटील,रेखा कंखरे, शैलेश बोरसे,विश्वास पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. फलक अनावरणाच्या कार्यक्रमानंतर आहील्यादेवीच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ प्रतिभा कंखरे यांनी केले तर सुत्रसंचलन दिलीप कंखरे यांनी केले. यावेळी मुख्यध्यापक प्रकाश कंखरे, पो पा नीलकंठ कंखरे, रमेश कंखरे, भिकन कंखरे, कल्पेश कंखरे, शाम कंखरे, विश्वास कंखरे, सुरेश कंखरे, राहुल पाटील संजय कंखरे सह ग्रामस्थ उपस्थित होते.