Sunday, November 27, 2022

वेरुळी येथील शिवसेनेचे तालुका प्रमुख यांच्या घरात धाडशी घरफोडी

- Advertisement -

पाचोरा (प्रतिनिधी) : वेरुळी खु” ता. पाचोरा येथील शिवसेनेचे तालुका प्रमुख शरद पाटील यांच्या घरी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात शिरुण कपाटाचे लाॅक तोडून 50 ते 55 हजाराची रोकड लंपास करण्याची घटना दि. 6 रोजी सकाळी उघडकीस आली त्यांच्या पत्नी मनिषा पाटील हे विद्यमान सरपंच व बचत गटाच्या अध्यक्ष असुन दोन दिवसांपूर्वीच त्यांनी बँकेतुन बचत गटाचे अडीच लाख रुपयाचे कर्ज काढून इतर महिलांना त्यातील रक्कम त्याच दिवशी बचत गटांच्या महिलांना पैसे वाटप केले तर उर्वरीत रक्कम पाहिले शिल्लकअशी पंचावन्न हजार रुपये कपाटात ठेवले होते सकाळी चार ते साडे चार दरम्यान शरद पाटील लघुशंकेसाठी उठले असता त्यावेळी त्यांचा हा घरफोडी झाल्याचा प्रकार लक्षात आला त्यांनी लगेच पोलिसांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला व सविस्तर माहिती दिली घटनास्थळी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील, राहुल बेहरे, खैरे, श्याम पाटील यांनी चौकशी करून पंचनामा केला असुन पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील घटनेचा तपास पो. नि. अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल श्याम पाटील हे करीत आहे. या चोरीच्या प्रकाराने परीसरात खडबळ उडाली आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या