वृत्तपत्र विक्रत्यास मारहाण प्रकरणी एक वर्षाची शिक्षा

0

जामनेर | प्रतिनिधी

तालुक्यातील शेंदूर्णी येथील वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारे सुनील अवधूत कासार यांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस एक वर्ष साधी कैद व एक हजार रुपये दंड ठोठावल्याचा निकाल जामनेर न्यायालयाचे न्यायाधीश ए ए कुलकर्णी यांनी सुनावला. सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील शेंदूर्णी येथील वाडी दरवाजा भागात सुनील कासार हे दि.9 जाने.2012 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास वृत्त पत्र विकत असतांना आरोपी ईश्वर उर्फ पक्या एकनाथ कोळी राहणार शेंदूर्णी याने दारूच्या नशेत वृत्तपत्र घेतले. फिर्यादीने त्याला पैसे मागितले आसता त्याचा राग येऊन आरोपीने फिर्यादीच्या नाकावर ठोसा मारून त्याला चापट्या भुक्यानी मारहाण केली .यावरून सुनील अवधूत कासार यांच्या फिर्यादीवरून पहुर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी ईश्वर उर्फ पक्या एकनाथ कोळी याच्या विरुद्ध गु र नंबर 7/2012 भा द वि कलम325 ,510 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या वरून न्यायालयाने एक वर्ष साधी कैद व एक हजार रुपये दंड व दंडाच्या रकमे पैकी 900 रुपये नुकसान भरपाई म्हणून फिर्यादिस द्यावी असा निकाल दिला आहे. या खटल्यात सरकारी पक्ष्यांच्या वतीने ऍड. अनिल सारस्वत यांनी बाजू मांडली.

Leave A Reply

Your email address will not be published.