वृक्ष लागवडीपाठोपाठ जलयुक्त शिवार योजनेचीही चौकशी होणार ; जयंत पाटील

0

मुंबई : फडणवीस सरकारच्या काळातील वृक्ष लागवडीपाठोपाठ जलयुक्त शिवार योजनेचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे संकेत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच या योजनेत जी कामे झाली ती चौकशीस पात्र असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.ते पुण्यात बोलत होते.

दरम्यान,  महाविकास आघाडीच्या सरकारवर ‘स्थगिती सरकार’ म्हणून होणारे आरोप  यावेळी जयंत पाटलांनी फेटाळून लावले. ‘आमच्या सरकारने कशालाही स्थगिती दिलेली नाही. जलसंधारण खात्याच्या कामांनाही स्थगिती दिलेली नाही. कोणत्याही मागच्या योजनांना स्थगिती देण्यात आलेली नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार जाण्याच्या दोन महिने अगोदर निधीचे वाटप हे स्वत:च्या सोयीच्या कार्यकर्त्यांसाठी करण्यात आले, त्यास मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. गरज बघून त्यापैकी काहींवरील अंशत: बंदी उठविण्यात आली आहे,’ असं पाटील यांनी सांगितलं.

जलयुक्त शिवार ही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वकांक्षी योजना होती. मात्र, या योजनेंतर्गत झालेली कामे अत्यंत खराब दर्जाची होती. यामुळे या योजनेची चौकशी होणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. जलयुक्त शिवारमुळे ७२ टीमसी पाणी अडवल्याचे मागच्या सरकारने सांगितले. मात्र, हे केवळ दिशाभूल असल्याचे लोकांच्या देखील लक्षात आले, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.