दंतेवाडा (छत्तीसगड) – आकाशातील वीज कोसळून इनामी नक्षली लीडर ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. कटेकल्याण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुफेडी-मनकपाल जवळच्या जंगलात ही घटना घडली. डोक्यावर आठ लाखांचे इनाम असलेला सुखराम नावाचा नक्षली लीडर जंगलात गावकऱ्यांची बैठक घेत होता. त्यावेळी अचानक पाऊस सुरू झाला आणि ढगांच्या गडगडटासह तेथे वीज कोसळली. अंगावर वीज कोसळल्याने नक्षली सुखराम ठार झाला आणि त्याचे चार साथीदार जखमी झाल्याची महिती गावकऱ्यांनी दिली आहे.
अनेक वर्षे नक्षली चळवळीत सामील सुखराम दंतेवाडा ब्लॉकमधील गदापाल येथे राहणारा होता. त्याला पकडण्यासाठी सरकारने आठ लाख रुपयांचे इनाम जाहीर केलेले आहे.
या संदर्भात पोलीसांनी तपास केला असता झालेली घटना खरी असल्याचे निष्पन्न झाल्याचे एसपी कमललोचन यांनी सांगितले. सुखरामचा अंत्यसंस्कार कमांडर गुंडाधर याच्या उपस्थितीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. जखमी झालेल्या चार साथीदारांवर जंगलात उपचार केले जात आहेत.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.