वीज कंपनीतर्फे ट्री कटींग: तीन तास वीज गुलने शहरवासी घामाघूम

0

भुसावळ :- पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजनां म्हणून वीज कंपनी कामाला लागली असून शहरातील न्यायालय फिडरवर वीज तारांना स्पर्श करणा-या झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम करण्यासाठी दिनांक १९ एप्रिल रोजी हनुमान जयंतीची सुटी असल्याने दुपारी १२ ते ३० वाजेदरम्यान वीजपुरवठा बंद केल्याने शहरवासीया घामाच्या धारांनी चिंब झाले होते. उन्हाळा सुरू झाल्याने आधीच शहराचे तापमान ४४ अंशावर पोहोचले असताना अचानक वीज गुल झाल्याने शहरवासीयांना चांगलाच मनस्ताप सोसावा लागला.

शुक्रवारी महावितरण कंपनीने दुपारी १२ ते साडेतीन वाजेदरम्यान तापीनगर सबस्टेशनच्या अंतर्गत येणार्या न्यायालय फिडरवर वीज तारांना स्पर्श करणार्या झाडांच्या फांद्या छाटल्या. परीणामी यावलरोड, शांतीनगरचा काही भाग, न्यायालयाच्या परीसरातील भाग, साईचंद्र नगर, राधास्वामी संकूल परिसर, तहसील कार्यालय भाग, गरुड प्लॉट, म्युनिसीपल पार्क, सातारे परीसरातील काही भाग, गवडी वाडा, दामू कुंभार वाड्याचा काही भाग आदी ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.