वीजबिलात सवलत द्या अन्यथा सरकारला चटका देऊ– आ. अँड आकाश फुंडकर

0

खामगावात भाजपाचे वीजबिल होळी करीत जन आक्रोश आंदोलन
खामगाव ::– राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने वीजबिलात सवलत द्या अन्यथा जनतेद्वारे सरकारला जोराचा चटका देऊन त्यांना कट करू, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाश फुंडकर यांनी केले. आज सोमवार दि. २३ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून जन आक्रोश आंदोलन केले त्यावेळी ते बोलत होते.
लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले आली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जामत्र्यांनीच स्वतः वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजपा वीजबिलांच्या होळीचे आंदोलन केले.
जिल्हाध्यक्ष अँड आकाश फुंडकर यांनी दिला . यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश सह संयोजक सगरदादा फुंडकर यांचेसह भाजप नेते रामचंद्र पाटील, नगराध्यक्ष सौ अनिताताई डवरे, जिल्हा सचिव संजय शिनगारे, शरदचंद्र गायकी, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, दिलीप पाटील, संजय शर्मा, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, किसान आघाडी तालुकाध्यक्ष संजय ठोंबरे, शांताराम बोधे, जि प सदस्य डॉ गोपाल गव्हाळे, संतोष टाले, न प आरोग्य सभापती राजेंद्र धानोकार, डॉ एकनाथ पाटील, प स सदस्य तुषार गावंडे, विलास काळे, राजेश तेलंग, भगाववनसिंग सोळंके , विजय महाले, वैभव डवरे,विजय महाले, नागेंद्र रोहनकार, जितेंद्र पुरोहित, विध्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शुभम देशमुख, भाजयुमो तालुकाध्यक्ष रुपेश खेकडे, बळीराम लाहुडकार, संतोष घोराडे, त्रंबक बनकर, गजानन मुळीक, चेतन महाले, गोपाल बाठे, नितीन पोकळे, सुरेंद्र पुरोहित, केशव मेहेसरे, जितेंद्र मेहरा,दीपक सुलतान,संजय मोहिते, विकास हटकर, प्रतीक मुंडे, संतोष येवले, अमोल ठाकरे, संजय भागदेवानी, गोलू आळशी, अनंता शेळके, महादेव वाळके, यांचेसह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी , सामान्य नागरिक उपस्थित होते. यावेळी ऊर्जामंत्री व राज्य सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करीत जोरदार घोषणाबाजी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.