Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»विहिरीत उडी घेवून एकाची आत्महत्या
    जळगाव जिल्हा

    विहिरीत उडी घेवून एकाची आत्महत्या

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 13, 2021No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  

    यावल तालुक्‍यातील किनगाव येथील ५५ वर्षीय व्यक्तीने  विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    प्रकाश दगडू पाटील (वय-५५, रा. किनगाव खुर्द ता. यावल) हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १२ ऑक्टोंबर सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान प्रकाश पाटील हे घरातून कोणालाही काहीही न सांगता दारूच्या नशेत बाहेर निघून गेले. त्यांची पत्नी व नातेवाईकांनी त्यांच्या शोधाशोध केली असता कुठेही मिळून आले नाही.

    दरम्यान प्रकाश पाटील यांचे चुलत भाऊ जगन पाटील यांनी गावातील काही मंडळींना सोबत घेऊन किनगाव शिवारातील धनंजय तुकाराम महाजन यांच्या शेतातील विहिरीजवळ रात्री ७ वाजता आले. त्यावेळी विहिरीच्या बाहेर बूट आणि तंबाखूची पुडी दिसून आले. त्यावरून गावातील एक जण विहिरीत उतरून पाहिले असता विहिरीच्या कपाऱ्या जवळ प्रकाश पाटील यांचा मृतदेह आढळून आला.

    प्रकाश पाटील यांनी विहिरीत उडी घेवून आत्महत्या का केली हे अजून स्पष्ट झालेले नाही. रात्री उशिरापर्यंत विहिरीतून मृतदेह काढून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी जगन पाटील यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  पुढील तपास पोलिस कर्मचारी करीत आहे.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    चिनावलच्या तरूणाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif