विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

0

पाडळे येथील घटना

रावेर : – तालुक्यातील पाडळे येथे एका शेतकऱ्याने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार रोजी घडली. घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे .
याबाबत माहिती अशी कि, पाडळे येथील शेतकरी मधुकर मोहन चौधरी(वय ५८ ) यांनी खानापुर येथील डॉ.भारंबे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मयत चौधरी यांच्याकडे शेती असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही . पोलिस पाटील यांच्या खबरीवरुन रावेर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास रावेर पोलिस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.