- Advertisement -
एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील खडके बु! येथे गुलाब नथ्थू पाटील (वय-५२) या इसमाने विषारी औषध सेवन केल्याने एरंडोल ग्रामीण रूग्णालय येथे उपचारार्थ नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याची तपासणी केली.या तपासणी अंती त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
याबाबत झुंबरसिंग पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी हेड काँन्स्टेबल विलास पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
- Advertisement -