जळगाव :- तालुक्यातील जळके येथील तरुणाने दोन दिवसापूर्वी शेतात विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान आज दुपारी दोन वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. याबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
गफूर राजमल तडवी (वय 27) असे या तरुणाचे नाव असून त्याने शनिवारी 11 मे रोजी दुपारी पिकांवर फवारणीचे विषारी औषध प्राशन केले होते. त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी जळगावच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु प्रकृती अधिकच खालावल्याने आज दुपारी दोन वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.