जळगावसह जिल्ह्यात ईद – उल -फित्र उत्साहात साजरी
जळगाव;- जगात सर्वत्र शांतता लाभावी देशात एकोप्याचे वातावरण राहून पाऊस चांगला पडून दिशांची भरभराट व्हावी अशी प्रार्थना मुस्लिम समाज बांधवांनी आज ईद – उल -फित्र अर्थात रमजान ईद निमित्त अल्लाहकडे केली . यावेळी जिल्ह्यात हिंदूमुस्लिम बांधवाणी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या . यावेळी जिल्ह्यात सर्वत्र ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
जळगाव ईदगाह मैदानावर रमजान ईदची नमाज अदा करण्यात आली . मुफ़्ती अतीकुर्रहमानयांनी ईदचे विश्व शांतिसाठिप्रार्थना केली .
अब्दुल करीम सालार यांनी प्रस्तावना साद रकेली . मौलाना उस्मान यांनी खुतबा व नमाज पठन केले. अमीन बदलिवाला यांनी आभार मानले.
यावेळी जिल्हाधिकारीकिशोरराजे निंबाळकर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे , सचिन सांगळे ,पी आय सुनील कुऱ्हाडे ,अनिरुद्ध आढाव,यांनी मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या . मुस्लिम समाजातर्फे गफ्फार मलिक, करीम सालार,फ़ारूक़ शेख,अमीन बदलिवाला,रागिब जागीरदार,रय्यान जागीरदार,गनी मेमन,एडवोकेट आमिर शेख,शरीफ शेख,प्रो डॉ इक़बाल शाह मुफ़्ती अतीकुर्रहमान यांनी हिंदूमुस्लिम समाज बांधवांचे आभार मानले .