विवेकानंद स्कूल प्राथमिक विभागाचे पारितोषिक वितरण

0

जळगाव प्रतिनिधी

11 ऑक्टोबर 2019 शुक्रवार रोजी विवेकानंद प्रतिष्ठान इग्लिश मिडीयम स्कूल प्राथमिक विभागात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा यासाठी विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल विविध स्पर्धांचे आयोजन करीत असते.
प्रथम सत्रामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये सहभागी इयत्ता 1 ली ते 4 थी च्या एकूण 78 विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यास्पर्धांमध्ये पाऊसगाणी, भक्तीगीत, मूर्ती बनविणे, रंगकाम, प्रश्नमंजुषा, गणपती, श्लोक पठन अशा विविध स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. तसेच नवनीत प्रकाशनतर्फे रंगकाम स्पर्धा कला शिक्षिका राजेश्वरी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात संगीत शिक्षिका शीतल सोनवणे यांनी हम होंगे कामयाब हे गीत सादर करून प्राथमिक विभागाच्या समन्वयिका सौ. रत्नमाला पाटील तसेच सौ. संध्या देशमुख यांचा हस्ते सरस्वती पूजन करून बक्षीस वितरण करण्यात आले. या प्रसंगी सौ. रत्नमाला पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वत:च्या आनंदासाठी प्रयत्न करून यश संपादन करावे तसेच प्रथम सत्र परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा मुळे व जयश्री पाटील, नियोजन सुनिता वेरुळकर तसेच आभार प्रदर्शन राजेश्वरी सोनवणे यांनी केले.
विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थी
नवनीत प्रकाशनतर्फे मास्टर स्ट्रोक चित्रकला स्पर्धा :-गट अ मध्ये गणेश हितेंद्र सावदेकर, दक्ष राकेश पाटील, अपूर्व जयेश पवार, रुद्र चंद्रकांत महाजन, योगेश नेरपगार, तनुज प्रमोद महाजन.
पाऊस गाणी स्पर्धा :- अपेक्षा नागरगोजे, अदवै जोशी, कार्तिक पाटील, वरद महाजन.
भक्तीगीत स्पर्धा :- सिद्धार्थ वाघ, रायन पाटील, दिव्या काटोले, अनन्य भोई.
मूर्तिकाम :- ओम मिस्तरी, अभिराज चव्हाण, धीरेन चौधरी, तनुश्री तायडे.
रंगकाम :- तनुश बढे, ख़ुशी पाटील, सानवी कुमारभट्टी, सार्थक शिंदे.
प्रश्नमंजुषा स्पर्धा :- प्रेम पाटील, वेदांत आमले, देवांशू पाटील, कुणाल मराठे.
गणपती स्पर्धा :- सोहम उमराने, समृद्धी पाटील, जिविका पाटील, मृणाली कोल्हे, तेजस वाणी.
श्लोक पठन :- प्रज्ञा कोळी, जिविका पाटील, काव्या पवार, आर्यन बडगुजर, विशाल पाटील या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

Leave A Reply

Your email address will not be published.