जळगाव :- दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी विश्वरत्न दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढण्यात अाला. या वेळी अपर जिल्हाधिकारी गाेरक्ष गाडीलकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात अाले.
दिव्यांगांना रेशनचे ३५ किलाे धान्य देण्यात यावे. लाल व पिवळ्या रेशन कार्डवर अंत्याेदयचा शिक्का मारुन त्वरित धान्य देण्यात यावे. दिव्यांगांना घरपट्टी, नळपट्टी व वीज बील माफ करण्यात येणार असल्याचे अाश्वासन मिळाल्यामुळे दिव्यांग अानंदीत झाले अाहेत. घरकूल याेजना, ५ टक्के निधी राखीव व कर्ज प्रकरणे पूर्ण करण्यात येतील असे अाश्वासन अामदार सुरेश भाेळे यांनी दिलेले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात अाले अाहे. या प्रसंगी संस्थेचे सल्लागार अॅड. चंद्रकांत शेळके, अध्यक्ष अशाेक बाविस्कर, संगीता चाैधरी, कल्पना भाेई, कुंदन लढ्ढा, विलास माेराणकर अादी उपस्थित हाेते.