विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांसाठी धावणार विशेष ट्रेन

0

नवी दिल्ली  : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पहिला लॉकडाऊन सुरु झाल्यावरपासून ट्रेन बंद झाल्या आणि अनेक जण आहे त्याच ठिकाणी अडकून पडले. या अडकलेल्या लोकांना आपापल्या घरी पोहोचवण्यासाठी विशेष जनसाधारण विशेष ट्रेन सुरु करण्यात येणार आहेत.

13 एप्रिल रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये विविध ठिकाणी अडकलेले लोक, स्थलांतरित मजूर यांना आपापल्या निश्चित स्थळी पोहोचवण्यासाठी जनसाधारण विशेष ट्रेन सुरु करण्याचे ठरवण्यात आले.लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांचे, स्थलांतरित मजुरांचे अतिशय हाल होत आहे. त्यातच महाराष्ट्रातील लॉकडाऊन 16 दिवस वाढल्याने हातावर पोट असणारे मजूर चिंताग्रस्त आहेत. काही ठिकाणी लोकांनी मिळेल त्या मार्गाने प्रवास केला. काहींनी चालत, बाईकवर, कंटेनरमधून, दुधाच्या टँकरमधून आपापल्या घरी जाण्याचा प्रयत्न केला.

ट्रेन बंद झाल्याने मुंबईतील कुर्ला टर्मिनसमवर अनेक प्रवासी अडकले. तर दिल्लीत बस स्टॅण्डवर तुफान गर्दी उसळली होती. त्यामुळे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अडकलेल्या प्रवासी आणि मजुरांचे रेस्क्यू ऑपरेशन केले जाणार आहे. यासाठी रेल्वेची मदत घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून मध्य आणि दक्षिण-मध्य विभागातून काही गाड्यांमधून मजुरांना आपापल्या गावाला पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.