Wednesday, August 17, 2022

विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

चाळीसगाव तालुक्यातील पाटणा येथील २२ वर्षीय विवाहित तरुणीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील पाटणा येथील सणुजा निरजराव फराटे (वय २२, ह.मु. पाटणा ता. चाळीसगाव) या विवाहित तरूणीचा शिवारातील एका विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवार रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सणुजा निरजराव फराटे ही विवाहित तरूणी आहे. तिचे सासर हे पुणे जिल्ह्यातील मांडवगण येथील आहे. तत्पूर्वी ती आपल्या आईवडिलांकडे आलेली असताना ही थरारक घटना घडली. वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास ठाकूर हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या