Wednesday, August 17, 2022

विवाहितेचा छळ; पतीसह ८ जणांवर गुन्हा दाखल

- Advertisement -

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

लग्नात व्यवस्थित हुंडा व पैसे दिले नाही म्हणून विवाहितेला मारहाण करून छळ करणाऱ्या पतीसह आठ जणांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

यावल येथील माहेर असलेल्या मोनिका मिलींद ताडे (वय-२६) रा. माटरगाव ता. शेगाव जि. बुलढाणा यांचा विवाह मिलींद अनिल ताडे यांच्याशी रितीरिवानुसार झाला. काही दिवस चांगले गेल्यानंतर पती मिलींद याने  विवाहितेला लग्नात व्यवस्थित हुंडा व पैसे दिली नाही. या कारणावरून शिवीगाळ करणे व मारहाण करणे सुरू केले.

तसेच सासू, आजल सासू, मावस सासू यांनी देखील विवाहितेला शिवीगाळ केली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता यावल येथील माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात पती मिलींद अनिल ताडे, सासू राजकन्या अनिल ताडे, मामे भाऊ सुमित प्रल्हाद विधाते, गैनिनाथा श्रीराम विधाते, आजल सासू कमलबाई श्रीराम विधाते, सुमित्रा विलासराव सौदागरे, रविंद्र भोजकर आणि मिरा भोजकर सर्व रा. माटरगाव ता. शेगाव जि. बुलढाणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या