Tuesday, August 16, 2022

विवाहितेचा एक लाखासाठी छळ; गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यावल तालुक्यातील साकळी येथील विवाहितेला माहेरवरून १ लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या लोकांनी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील साकळी येथील माहेर असलेल्या शमिमबी शेख अनवर (वय २२) यांचा विवाहित यावल शहरातील आयशा नगरातील शेख अनवर शेख मुसा यांच्याशी २०१९ मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती शेख अनवर शेख मुसा याने विवाहितेला माहेरहून १ लाख रूपये आणण्याची मागणी केली. विवाहितेच्या आईवडीलांची परिस्थिती हालाखीची असल्याने पैश्यांची पुर्तता करू शकत नाही असे सांगितल्यावर विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.

सासू व सासरे, जेठ आणि जेठाणी यांनी विवाहितेला शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत विवाहितेला घरातून हाकलून दिले. या छळाला कंटाळून विवाहिता मोहरी निघून आल्या.

विवाहितने सोमवारी ३ जानेवारी रोजी रात्री १० वाजता यावल पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात पती शेख अनवर शेख मुसा, सासरे शेख मुसा शेख कादर, सासू नमजाबी शेख मुसा, जेठ शेख मोमीन शेख मुसा आणि जेठाणी नसीमबी शेख मोमीन सर्व रा. आयशा नगर, यावल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या