रावेर :- तालुक्यातील विवरे येथील जवळजवळ एक महिन्यापासुन विवरे सह परिसरात लग्नसराईची धामधूम बघायाला मिळत आहे . कडक उन्हाळा असुन नवरदेवाच्या जिवाचीही लाहीलाहीहोत आहे. त्यात भर उन्हात मंडापातही पंगती बसत आहे .परिसरातील वराडी मंडळी बाँडपथकांसह वाजतगाजत नाचत मांडपामध्ये पोहचत आहे. वराडी देखील लगन लावण्यासाठी कडक उन्हात धावपाडकरित असताना दिसत आहे . गावतलगन असला तरी थंडपेच्या दुकानावर देखील गर्दी होत आहे.
विधार्थी मामाच्या गावाकडे
सध्या १ ली ते १२वीपर्यंतची परिक्षा संपलेली आहे .विद्यार्थी अता मस्त दिसत आहे . उन्हाळ्याच्या सुट्या कुठे पार पाडयाच्या तर बाहुतेक विद्यार्थी अतापासूनच मामांच्या गावंकडे जात असताना दिसत आहे . बस्थांनाकावरगर्दी होत आहे . मोठ्या आनंदाने आनेक विद्यार्थी आपल्या सुट्या पारपाडतील .
मतदानाची जय्यत तयारी
विवरे सह परिसरात लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. गावत मतदातामध्ये या लोकसभा निवडणुकाची उत्सुकता निर्माण झाली असुन बाजार चौकात देखील या निवडणुकाची चर्चा शिगेला पोहचली आहे.