विवरे, ता. रावेर | प्रतिनिधी
तालुक्यातील विवरे येथे जलद बस थांबत नसल्याने शाळकरी विद्यार्थी व नागरीकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
याबाबत अधिक वृत्त असे की, रावेर आगारांची एस.टी.बस सकाळच्या वेळेला पाच-सहा गाडया येतात. दररोज या वेळेला येणार्या जाणार्यांची संख्या अधिक असते त्यात शाळेत जाणारे विद्यार्थी देखील आहे. मुजुर वर्ग, शिक्षक आदिंचा समावेश भरपूर आहे. मात्र रावेरकडून जलद बस बस्थांनकावर न थांबता भरधाव वेगाने निधून जाते. प्रवाशी हात दाखुन सुधा गाडी थांबत नाही. यामुळे काहींना वेळेवर आपल्या ठिकाणी पोहोचता येत नाही. नाईलाजाने त्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.
सदर बसस्थानकावर प्रवाशी एस.टी.बसच्या भरवशावर येतात की, आपली गाडी वेळेवर येईल मात्र त्यांच्या पदरात निराशा पडत आहे. याचा फायदा अवैध वाहन धारकांना होतांना दिसत आहे. महामंडळ एकीकडे हात दाखवा गाडी थांबवा, असा नारा देतात व दुसरीकडे बस धावून जातात. विवरे हे गाव बर्हाणपूर-अंकलेश्वर या महामार्गावर आहे. या गावातील नागरीक खाजगी कामासाठी, नोकरी निमित्त व शाळकरी विद्यार्थी शाळेला जाण्यासाठी मोठ्याप्रमाणात वर्दळ असते. तरी जलद बस विवरे येथे थांबवावी अशी मागणी नागरीकांमधून होत आहे.