विल्हाळे येथे कोरड्या तलावात झक मासे मारो आदोलन

0

वरणगाव भुसावळ तालुक्यातील विल्हाळे येथील पाषष्ठ वर्षा नतंर प्रथम कोरडा पडल्याने आठ गावाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याच्या भितीने सभांसी ब्रिगेड (भुसावळ तालूका ) संघटनाने शुक्रवारं सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कोरडया तलावात प्रतिकात्मक झक मासे मारो आदोलन करण्यात आहे
येथुन जवळच असलेल्या विल्हाळे तलावाचे पाषष्ठ वर्षा नंतर प्रथमच कोरडा पडला आहे पाण्याचा शुन्य टक्के साठा झाल्याने या परिसरातील आठ गावाच्या पाण्याचा मोठा प्रश्न समोर असल्याने भुसावळ तालुका संभाजी ब्रिगेडचे जिल्हा ध्यक्ष डॉ अनिल पाटील यांच्या सुचनेनुसार विल्हाळे तलावाचे खोलीकरण होऊन ती माती राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला वापर करण्याकामी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती मात्र जिल्हा प्रशासना कडून प्रतिसाद मिळत नसल्यान शुक्रवारी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष आकाश कुरकरे सरपंच विजय पाटील , ज्ञानेश्वर आमले, महेश महाजन , नागो पाटील , राजेंद्र सुरवाडे , दिनेश पाटील , यांच्या सह विल्हाळ , खडका ,मन्यारखेडा येथील शेतकर्‍यानी प्रशासनाचे या पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक झक मासे मारो आदोलन केले आदोलन शांततेत पार पडते .

Leave A Reply

Your email address will not be published.