विरोधकांना वाटत होते मी परत येणार नाही : आ.खडसेंचा हल्लाबोल

0

जळगाव – रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारसभेत विरोधकांचा समाचार घेतला. विरोधकांना वाटत होते मी दवाखान्यातून परत येणारच नाही. परंतु त्यांना मी पुढे घालीन मगच मी जाईन, असा हल्ला त्यांनी आपल्या भाषणात चढवला.

काही दिवसांपर्यंत मुंबई येथे रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे हे नुकतेच घरी परतले आहेत. ते केव्हा परत येतात व प्रचारात उतरतात याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागून होते. सोमवारी बोदवड येथे रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर चांगला हल्लाबोल केला. सभेत त्यांनी सांगितले की, विरोधकांना वाट होते की, नाथा भाऊ दवाखान्यातून परतच येणार नाही व प्रचारात सहभागीही होता येणार नाही. परंतु मी जनतेच्या आशीर्वादाने आज येथे उभा असल्याचेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.