विराज कावडिया यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड

0

सेना महानगर प्रमुख शरद तायडे यांनी केली घोषणा

जळगाव – शहर महानगरपालिका च्या स्वीकृत सदस्यपदी शिवसेनेचे विराज कावडिया यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे यांनी परिपत्रक काढून केली

विराज कावडिया

जळगाव महानगरपालिकेत शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक अमर जैन यांनी पूर्वनियोजना प्रमाणे राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त जागी युवाशक्तीचे तथा सामाजिक कार्यकर्ते विराज कावडिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

रिक्त जागेसाठी अनेकांनी नेत्यांकडे मोर्चेबांधणी केली. अखेर शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी आमदार सुरेशदादा जैन, संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, मनपा विरोधी पक्ष नेते सुनिल महाजन यांनी केलेल्या चर्चेनुसार स्वीकृत नगरसेवक म्हणून विराज कावडिया यांच्या नावाची शिफारस केली आहे. असे पत्रक तायडे यांनी प्रसिद्धीला दिले.

विराज कावडिया यांची घोषणा होताच युवाशक्ती च्या आणि सेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कावडिया यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या निवडीला संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवकपदी विराज कावडिया यांचे नाव निश्चित झाले असल्याचे पत्र महानगरप्रमुख शरद तायडे यांनी दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.