विमलताई रघुवंशी यांचे निधन

0
नंदुरबार-नंदुरबार तालुका विधायक समितीच्या अध्यक्षा विमलताई बटेसिंह रघुवंशी (वय ८२) यांचे काल (दि.१४ फेब्रुवारी) दुपारी ३ वाजता धुळे येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. आज दि.१५ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता नंदुरबार येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल. जी.टी.पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात अंतिम संस्कार होतील.
श्रीमती रघुवंशी काही दिवसांपासून आजारी होत्या. धुळे येथे उपचार करण्यात येत होते. आज त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या पश्‍चात मुले ज्येष्ठ विधिज्ञ ऍड.राजेंद्र रघुवंशी, माजी आमदार, शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी, नंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, मुलगी अर्चना रघुवंशी, सून अनिता रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, कविता रघुवंशी, नातू जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, किरण रघुवंशी, डॉ.तुषार रघुवंशी तसेच नातवंडे होत.
अल्प परिचय
इंदिरा महिला सहकारी बँकेच्या संस्थापक अध्यक्षा, नंदुरबार तालुका विधायक समितीच्या अध्यक्षा, इंदिरा महिला सहकारी गृहउद्योग व जीवनाश्यक वस्तु पुरवठा भांडाराच्या अध्यक्षा यासह विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. तसेच नंदुरबार नगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून त्यांनी १० वर्ष काम पाहिले. त्यांना साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचा वेणुताई शंकरराव बेडसे आदर्श माता पुरस्कार मिळाला होता.
Leave A Reply

Your email address will not be published.